आवडेल मला तुझ्याशी बोलायला
प्रत्येक क्षणाला तुझ्या आठवणीत रहायला
सांग आवडेल का तुला ….!
तु समोर नसताना तुझ्याशी बोलायला
तु जवळ नसताना तूझ्याशी गप्पा मारायला
सांग आवडेल का तुला ….!
स्वप्नात येऊन तु माझ्या सोबत रहायला
जग सुंदर असताना सुंदर जगात तुला पहायला
सांग आवडेल का तुला ….!
माझ्या शब्दांना तुझी साथ मीळेल का मला
प्रत्येक भावना तुझ्याशी शेअर करायला
सांग आवडेल का तुला ….!
माझ्या डोळयातल्या अश्रूंना आवर तु घालशिल का
सोबत माझ्या नेहमी तु राहशील का
सांग आवडेल का तुला ….!
~ सुप्रिया पडिलकर .
May I know, in which language you write?
I am unable to grasp.
LikeLiked by 1 person
आभार …!
LikeLike
वाह सुरेख
LikeLiked by 1 person