शाळा कॉलेजचे सहजीवन संपते आणि निरोप देण्या-घेण्याची वेळ येते तेंव्हा मनाची घालमेल होते. जुन्या त्या आठवणींनी सुचलेल्या काही ओळी… मैत्रीला निरोप…!!!!
मैत्रीचं ते अनोखे जग
असे मोडवत नव्हते.
भूतकाळाला वर्तमानापासून
काही केल्या तोडवत नव्हते.
जगलेले ते सारे सुंदर क्षण
दूर जावु लागले होते.
नियतीचे हे विलक्षण खेळ
क्रूर वाटु लागले होते.
मनाचे रोखलेले सारे बांध
तेंव्हा फुटले होते.
थकलेल्या पापण्यांना सारून
अश्रु माझे ढळले होते.
एवढ्या दिवसांची सोबत
अर्ध्यावर सुटली होती.
मैत्री राहिली फक्त नावाला
साथ मात्र तुटली होती.
Thank you .
LikeLike
👌👌👌
LikeLiked by 2 people
आप को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं
LikeLiked by 2 people
Thank you very much….
LikeLiked by 1 person
Kripya kar ke mere doosre account ko follow kar li jiye. https://wordpress.com/read/feeds/98199329
LikeLiked by 1 person